शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल !

शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल !

बेळगाव – शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरोधात बेळगावातील टिळक वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आचारसंहितेचा भंग आणि दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी आयपीसी 153 अ, 505(2)125, 171(फ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर कर्नाटकमध्ये अचारसंहिता लागू झाली आहे. काल बेळगाव लाईव्हच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी भाषण केलं होतं. या भाषणादरम्यान त्यांनी सीमा भागातील मराठी भाषिकांची कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या गळचेपीबाबत जोरदार टीका केली होती.

दरम्यान महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सिमेवर असलेलं बेळगाव महाराष्ट्राचाच एक भाग असून न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत हा भाग सरकारनं केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, अशी मागणी राऊत यांनी केली होती. ‘आम्हाला बेळगावात जाण्याची परवानगी हवी आहे. पाकिस्तानात जाण्याची नाही. बेळगाव महाराष्ट्राचाच एक भाग आहे. दोघांचा इतिहास सारखाच आहे, दोघांची संस्कृती सारखीच असून या सीमावर्ती भागावर कोर्टाचा निर्णय येईलच. पण तोपर्यंत हे क्षेत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात यावं अशी मागणीही राऊत यांनी केली होती. तसेच जेव्हा कधी बेळगाव आणि इतर सीमावर्ती भागातील नागरिकांवर अन्याय होतो, तेव्हा त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या सर्वच भागांत दिसून येतोय. काश्मीर, सतलज आणि बेळगावचा प्रश्न लोकशाही पद्धतीनं सोडविला जात नसेल तर तो आम्ही ‘ठोकशाही’नं सोडवू, असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यांच्या य भाणानंतर पोलिसांनी त्यांच्या गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS