जळगावमधील भाजप नगरसेविकेच्या पतीवर गोळीबार !

जळगावमधील भाजप नगरसेविकेच्या पतीवर गोळीबार !

जळगाव – जळगाव महापालिकेतील भाजप नगरसेविकेच्या पतीवर अज्ञातांनी गोळीबार केला आहे. माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या छातीत गोळी घुसली असल्याची माहिती आहे. आज सकाळी ही घटना घडली असून संतोष पाटील यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान संतोष पाटील यांनी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेविका आहेत. सकाळी साडे दहाच्या सुमारास गिरणा नदीकडे शेतात जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे.त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णालयात प्रचंड गर्दी केली आहे.

 

COMMENTS