चीनच्या राष्ट्रपतींकडून पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींचं ऐतीहासिक स्वागत !

चीनच्या राष्ट्रपतींकडून पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींचं ऐतीहासिक स्वागत !

वुहान – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनच्या दौ-यावर आहेत. या दौ-यादरम्यान पहिल्यांदाच चीनच्या राष्ट्रपतींनी राजधानी बीजिंगबाहेर येऊन भारताच्या पंतप्रधानांचं स्वागत केलं आहे. तसेच तमाम भारतीयांसाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या अनौपचारिक बैठकीदरम्यान म्हटलं आहे. २०१९ मध्ये अशाचप्रकारची बैठक भारतात आयोजित करण्यास आम्ही उत्सुक असल्याचेही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच भारत आणि चीनवर जगातील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकांच्या कल्याणाची जबाबदारी असल्यामुळे दोन्ही देशांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान गेल्या २००० वर्षांपैकी १६०० वर्षे भारत आणि चीनने जागतिक आर्थिक वृद्धीसाठी एखाद्या इंजिनाप्रमाणे काम केले असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. जागतिक विकास आणि शांततेसाठी भारत आणि चीन या देशांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे. तसेच शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी दोन्ही देश महत्त्वाची भूमिका निभावतील, असा विश्वास यावेळी मोदींनी व्यक्त केला आहे.

 

 

COMMENTS