पहिल्या टप्प्यात सरासरी 55 टक्के मतदान !

पहिल्या टप्प्यात सरासरी 55 टक्के मतदान !

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात शांततेत मतदान पार पडलं. आज सकाळी ७ वाजेपासून शांततेत मतदानास सुरूवात झाली होती. दुपारी 5 वाजेपर्यंत सरासरी 55 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात पुढीलप्रमाणे मतदान झाले आहे.

दरम्यान वर्धा 55.36 टक्के, नागपूर 53.13 टक्के, यवतमाळ-वाशिम 53.97 टक्के, भंडारा-गोंदिया 60.50 टक्के, चंद्रपूर 55.97 टक्के, रामटेक 51.72 टक्के, गडचिरोली 61.33 टक्के मतदान पार पडलं आहे.

दरम्यान गडचिरोलीत मतदान संपल्यानंतर नक्षलवाद्यांनी हल्ला केला असल्याची माहिती आहे. यामध्ये सी सिक्सटी कमांडो पथकाचे तीन जवान जखमी झाले असून एटापल्ली तालुक्यातील पुलसलगोदी परिसरातही  घटना घडली आहे. यावेळी बेस कॅम्पवर परतणाऱ्या नक्षलविरोधी सी सिक्सटी कमांडो पथकाला नक्षलवाद्यांनी  टार्गेट असून नक्षलवाद्यांकडून आईडीचा स्फोट करुन गोळीबार करण्यात आला.

COMMENTS