केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांची शेतकय्रांसाठी महत्त्वाची घोषणा!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांची शेतकय्रांसाठी महत्त्वाची घोषणा!

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत ‘स्वावलंबी भारत’ संकल्पाचा नारा दिला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वावलंबी भारत अभियान’ पॅकेज जाहीर केलं. 20 लाख कोटी रुपयाचं हे पॅकेज आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची सविस्तर माहिती दिली.

त्यानंतर आज पुन्हा सितारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी आणखी माहिती दिली. त्यामध्ये शेतकरी आणि मजुरांबरोबर छोट्या दुकानदारांसाठी भरीव मदत जाहीर करण्यात आली आहे. 3 कोटी शेतकऱ्यांना 4.22 लाख कोटींचं कर्ज दिलं आहे. त्यांना पुढचे सहा महिने कर्जाची परतफेड केली नाही तरी चालणार आहे. तसेच कृषी क्षेत्रासाठी एकूण 86,600 कोटी रुपयांचं ऋण देण्याची योजना असल्याचं त्या म्हणाल्या.

किसान क्रेडीट कार्डांतर्गत 2 लाख कोटी देणार, 2.5 कोटी शेतक-यांना याचा लाभ मिळेल, मच्छीमार व दुग्धव्यवसायकांनाही किसान क्रेडीट कार्ड, शेतकरी, मच्छीमार, दुधव्यावसायिकांना सवलतीत कर्ज देणार असल्याचंही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.

तसेच सर्व मजुरांना अजून 2 महिने मोफत अन्नधान्य देणार, 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 1 किलो चना डाळ 8 कोटी मजुरांना देणार, यासाठी 3500 कोटी देणार असल्याचंही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे.

तसेच पीक कर्जावर व्याजदरात सवलत देणं सुरूच राहणार असून  आतापर्यंत मजूर आणि स्थलांतरित कामगारांसाठी 11000 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.सहकारी आणि स्थानिक पतसंस्था आणि बँकांना मदत करणार असून त्यासाठी 25,500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

शहरातल्या गरिबांना मदत करण्याकरता 7200 बचत गट स्थापन करण्यात आले.राज्यांना पीक खरेदीसाठी 6700 कोटी दिले. मार्चमध्ये 4200 कोटी रुपयांचं ग्रामीण इन्फ्रा फंड देण्यात आला असल्याचंही सितारामन यांनी म्हटलं आहे.

COMMENTS