काँग्रेसमध्ये गेलेल्या भाजपच्या माजी खासदार स्थापन करणार स्वत:चा पक्ष!

काँग्रेसमध्ये गेलेल्या भाजपच्या माजी खासदार स्थापन करणार स्वत:चा पक्ष!

नवी दिल्ली – काँग्रेसमध्ये आपला आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या माजी खासदार सावित्रीबाई फुले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सावित्रीबाई फुले यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
आता आपण स्वत:चा पक्ष स्थापन करणार असल्याचं फुले यांनी जाहीर केलं आहे.सावित्रीबाई फुले यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून जेमतेम वर्ष झालं. त्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.त्यानंतर वर्षभराच्या आतच काँग्रेसचाही ‘हात’ त्यांनी सोडला. फुले आता स्वतःचा पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान सावित्रीबाई फुले यांनी 2012 मध्ये भाजपच्या तिकिटावर बलहा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. 2014 मध्ये त्यांना खासदारकीचं तिकीट देण्यात आलं होतं. निवडणूक जिंकत फुलेंनी संसदेत पाऊल ठेवलं होतं. भाजपचा अनुसूचित जातीवर्गाचा महिला चेहरा म्हणून त्यांना ओळख मिळाली होती. परंतु त्यानंतर त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

COMMENTS