भूताला घाबरून सोडला माजी मंत्र्यानं बंगला !

भूताला घाबरून सोडला माजी मंत्र्यानं बंगला !

पाटणा – मला सरकारी निवास्थानाबाहेर काढण्यासाठी  मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माझ्या बंगल्यात भूत पाठवलं असल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेज प्रताप यादव यांनी केला आहे. सत्ता गेल्यानंतर सहा महिन्यांनी तेज प्रताप यादव यांनी त्यांचे अधिकृत सरकारी निवासस्थान सोडले असून मला त्रास देण्यासाठी नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी माझ्या बंगल्यात भूत सोडलं होतं असा आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये तेज प्रताप आरोग्य मंत्री होते. त्यावेळी त्यांना देशरत्न मार्गावरील 3 नंबर बंगला देण्यात आला होता. परंतु सरकार कोसळल्यानंतर नितीश कुमारांनी मला बंगल्यातून काढण्यासाठी भूत सोडलं असल्याचा आरोप केला आहे. सरकार कोसळल्यानंतर ऑगस्ट महिन्यात बिहार सरकारने राजद आणि काँग्रेसच्या मंत्र्यांना बंगले रिकामी करण्याचे आदेश दिले होते. तेज प्रताप यादव अति धार्मिक, दैववादी आहेत. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात यादव कुटुंबाविरोधात केंद्रीय पथकाकडून चौकशी सुरु असताना तेज प्रताप यांनी बंगल्यामध्ये दुश्मन मारनं जपही केला होता असे सूत्रांनी सांगितले आहे.

COMMENTS