एकनाथ खडसेंच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग, गेल्या दोन महिन्यात पाच माजी आमदार राष्ट्रवादीच्या गोटात !

एकनाथ खडसेंच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग, गेल्या दोन महिन्यात पाच माजी आमदार राष्ट्रवादीच्या गोटात !

मुंबई – ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु झालं आहे. गेल्या दोन महिन्यात जवळपास पाच माजी आमदार राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. खानापूर आटपाडी येथील भाजपचे माजी आमदार सदाशिव पाटील उदेसिंग पाडवी भाजपमधून, गंगाखेड, परभणी येथील सीताराम घनदाट तर चिपळूण, रत्नागिरी
येथील रमेश कदम यांनी राष्ट्रवादी-शेकाप-भाजप-काँग्रेस –राष्ट्रवादी अशी घरवापसी केली आहे. आणि आता हातकणंगले जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे खडसे यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग सुरु झालं असल्याचं दिसत आहे..

दरम्यान माजी आमदार राजीव आवळे हे शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. राजीव आवळे 2004 मध्ये जनसुराज्य पक्षाच्या चिन्हावर हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते. कुंभोज मतदारसंघातून त्यांच्या पत्नी स्मिता आवळे या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. मात्र, शिवसेनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांनी राजीव आवळे यांचा पराभव केला होता. इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवलेला सर्वात तरुण चेहरा अशी राजीव आवळे यांची ओळख आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी ते नगराध्यक्ष झाले होते.

नगराध्यपदाच्या खुर्चीवर विराजमान असतानाच आवळेंनी वडगाव मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरुन कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्राचं लक्ष वेधून घेतलं होतं. वडगाव हा काँग्रेसचा गड मानला जात होता. मात्र, राजीव आवळे यांनी माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचं 25 वर्ष एकहाती वर्चस्व असलेल्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पक्षाला मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येईल का? आलीच तर सरकारची तयारी काय आहे ? नक्की पहा राजेश टोपे काय म्हणत आहेत ?

 

 

 

 

 

COMMENTS