गडचांदूर नगरपालिकेत भाजपला धक्का, नगराध्यक्षपदाच्या लढतीत काँग्रेसचा विजय!

गडचांदूर नगरपालिकेत भाजपला धक्का, नगराध्यक्षपदाच्या लढतीत काँग्रेसचा विजय!

चंद्रपूर – गडचांदूर नगरपालिका निवडणूकीतील थेट नगराध्यक्ष लढतीत काँग्रेसच्या सविता टेकाम यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला आहे. टेकाम यांनी भाजप उमेदवाराचा 1500 मतांनी पराभव केला आहे. ही निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं एकत्रित येऊन लढवली होती. या नगरपालिकेत काँग्रेस 5, शिवसेना 5, राष्ट्रवादी 4, भाजप 2, शेतकरी संघटना 1 अशी नगरसेवकांची स्थिती आहे.

दरम्यान यापूर्वी गडचांदूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या सात होती. परंतु त्यातील चार नगरसेवकांनी राष्ट्रवादी सोडत तत्कालीन नगराध्यक्षा विजयालक्ष्मी डोहे, तत्कालीन गटनेते निलेश ताजने, शांता मोतेवड अशा तीन बालाढ्यांनी राष्ट्रवादीची घड्याळ सोडत कमळ हातात घेतलं होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेले हाफीस गनी यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये असणारे सागर ठाकुरवार यांनी सुद्धा काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा धनुष्यबान हाती घेतला होता. परंतु राज्यात भाजपची सत्ता गेल्यानंतर आता गडचांदूर नगरपालिकेतही काँग्रेस-राष्ट्रवादीनं भाजपला धक्का दिला आहे.

COMMENTS