राष्ट्रवादीतील सडके आंबे भाजपमध्ये नको –गिरीश बापट

राष्ट्रवादीतील सडके आंबे भाजपमध्ये नको –गिरीश बापट

पुणे   राष्ट्रवादीतील सडके आंबे भाजपमध्ये आणू नका, एक सडका आंबा सगळे आंबे सडवतो. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील सडके आंबे भाजपमध्ये आणून, आपले आंबे सडवू नका, अशी जोरदार टीका पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली आहे. मावळ तालुक्यातील कार्ला येथील अनेक शिवसैनिकांनी बापट यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी बोलत असताना बापट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर जोरदार टीका केली असून राष्ट्रवादीतील सडक्या आंब्यांना भाजपमध्ये आणू नका असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान शिवसेना हा भाजपचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे  त्यांचे कार्यकर्ते भाजपमध्ये आले तर येऊ द्या असा सल्लाही बापट यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.तसेच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांचं स्वागत करतो. अजून कोणी राहिलं असेल, तर त्यांनाही घेऊन या. फक्त राष्ट्रवादीचं कोणी आणू नका. तसंही राष्ट्रवादीत कोणी राहिल नसून पळापळ झाली आहे. पण शिवसेनेतून आपल्या पक्षात येऊ द्या. शिवसेना आपला मित्रपक्ष आहे,  त्यामुले आपल्याला काही अडचण नाही असंही बापट यांनी म्हटलं आहे.

COMMENTS