त्यामुळे अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला – गिरीश महाजन

त्यामुळे अहमदनगर महापालिकेत राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला – गिरीश महाजन

अहमदनगर – अहमदनगर महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपनं बाजी मारली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं भाजपला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला विकासाच्या मुद्यावर पाठिंबा दिला असल्याचं जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बसपा आणि इतरही काही पक्ष उमेदवारांनीही आम्हाला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. निवडणुकीसाठीचे संख्याबळ जुळत असल्याने आम्ही हा पाठिंबा घेतला असल्याचंही महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या झालेल्या अनपेक्षित युतीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. या अनपेक्षित युतीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या युतीवर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. परंतु गिरीश महाजन यांनी मात्र ही शक्‍यता फेटाळून लावली असून या स्थानिक निर्णयाचा लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही.

शिवसेनेनेही अनेक ठिकाणी काँग्रेसशी युती करत जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापन केली आहे. त्याचा राज्यपातळीवर परिणाम होत नाही. नगरमध्ये झालेली आघाडी स्थानिकच असल्याचं गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे.

COMMENTS