गिरीश महाजनांचं आंबेडकर जयंतीत लेझीम नृत्य !

गिरीश महाजनांचं आंबेडकर जयंतीत लेझीम नृत्य !

जळगाव – भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लेझीम नृत्ये केलं आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गिरीश महाजन यांनी लेझीम नृत्य केलं असून ते गेल्या 25 वर्षांपासून मतदारसंघात म्हणजेच जामनेर शहरात आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. या मिरवणुकीमध्ये ते केवळ सहभागीच नव्हे तर त्यात लेझीमच्या तालावर सबंध मिरवणूकभर नाचत देखील असतात.

दरम्यान आज सकाळी जामनेर शहरात जयभीम नगरामधून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत खास निळा शर्ट परिधान करुन मोठ्या उत्साहात गिरीश महाजन हे कार्यकर्त्यांसोबत लेझीमच्या तालावर नाचले आहेत. यावरुन राज्याचे जलसंपदा मंत्री हे पद मिळाल्यावर देखील त्यांनी आपली ही परंपरा कायम ठेवली असल्याचं पहावयास मिळालं आहे.

COMMENTS