मंत्रालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न !

मंत्रालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न !

मुंबई – मंत्रालयामध्ये पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न करण्याची घटना घडली असून
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन एका तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पहिल्या मजल्यावर जाळी लावली असल्याने या तरुणीचा जीव वाचला असून मरिन ड्राईव्ह पोलीसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

प्रियांका गुप्ता असं आत्महत्येचा प्रयत्न करणाय्रा महिलेचं नाव आहे. तिचा पती गेले काही वर्षांपासून आजारी आहे. त्यांच्या उपचारांचा खर्च हाता बाहेर गेल्यामुळे तीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात दिरंगाई होत असल्यामुळे तिने हे पाऊल उचललं असल्याची माहिती आहे. महाविकासआघाडी सरकार स्थापन होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. या सरकारच्या काळातील मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करण्याची ही पहिली घटना घडली आहे. त्यामुळे यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय पाऊल उचलणार ते पाहण गरजेचं आहे.

COMMENTS