मुंबईत पृथ्वी शॉला हक्काचं घर द्या, शिवसेनेच्या आमदाराची मागणी !

मुंबईत पृथ्वी शॉला हक्काचं घर द्या, शिवसेनेच्या आमदाराची मागणी !

मुंबई – अंडर-19 टीमचा कॅप्टन पृथ्वी शॉला हक्काचं घर देण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारानं केली आहे. पृथ्वी शॉनं विश्वचषक उंचावत जगाच्या नकाशावर भारताचा झेंडा अभिमानानं मिरवला आहे. त्यामुळे त्याचं जगभरात कौतुक केलं जात असून पृथ्वीला मुंबईत हक्काचं घर नाही. त्यामुळे त्याला हक्काचं घर देण्याची मागणी शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


यापूर्वी पृथ्वी शॉ विरारमध्ये राहत होता. 2013 मध्ये पृथ्वीनं हॅरीस शिल्डमध्ये 500 धावा पटकावल्या होत्या. त्यानंत आमदार पोतनीस यांनी त्याची व्यवस्था वाकोल्याच्या एसआरए कॉलनीत केली होती. परंतु ही जागा अपुरी असल्यामुळे कायमस्वरुपी वास्तव्यासाठी त्याला हक्काचं घर देण्याची मागणी पोतनीस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

COMMENTS