मनोहर पर्रिकरांची प्रकृती बिघडली, मुंबईतील रुग्णालयात दाखल !

मनोहर पर्रिकरांची प्रकृती बिघडली, मुंबईतील रुग्णालयात दाखल !

मुंबई – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनोहर पर्रिकर यांना फूड पॉयझनींग झालं असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.  काल सकाळपासून पोटात दुखत असल्याने काल संध्याकाळच्या आणि आज सकाळच्या सर्व बैठकी रद्द  करण्यात आल्या होत्या.आज काही महत्त्वांच्या बैठकांसाठी ते मुंबईत आले होते. परंतु पोटाचा त्रास वाढल्यामुळे सर्व बैठका रद्द करुन त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांकडून त्यांची तपासणी सुरु असून सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS