गोव्यात काँग्रेसला धक्का, 10 आमदार भाजपात, विरोधी पक्षनेता होणार उपमुख्यमंत्री?

गोव्यात काँग्रेसला धक्का, 10 आमदार भाजपात, विरोधी पक्षनेता होणार उपमुख्यमंत्री?

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसला गोव्यामध्ये मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे. गोव्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली असून विधानसभेच्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनापूर्वी काँग्रेसचे 10 आमदार फुटले आहेत. हे 10 आमदार भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेेत. काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते बाबू कवळेकर हे देखील भाजपात जाणार अशी चर्चा असून त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.

यावरुन सरकारमध्ये असणाऱ्या गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष यांना बाजूला करण्याची भाजपानं रणनिती आखली असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान राज्यपाल मृदला सिन्हा या दिल्लीत असून आज रात्री उशिरा दिल्लीहून त्या गोव्यात दाखल होणार होणार आहेत. त्या गोव्यात दाखल झाल्यानंतर लगेचच किंवा उद्या सकाळी या नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची चर्चा आहे.

गोवा विधानसभेतील साध्याच संख्याबळ

भाजपा – 17
काँग्रेस – 16
महाराष्ट्र गोमंतक पक्ष – 1
गोवा फॉरवर्ड – 3
अपक्ष – 3

COMMENTS