प्लास्टिक बंदीबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय !

प्लास्टिक बंदीबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय !

मुंबईप्लास्टिक बंदीबाबत राज्य शासनानं मोठा निर्णय घेतला असून प्लास्टिकविरोधात  पर्यावरण खात्याने आता कडक पावलं उचलली आहेत. यापुढे प्लास्टिक पिशवी दुकानात सापडली तर दुकानाचा परवानाच रद्द करण्यात येणार आहे. आज प्लास्टिक बंदी संदर्भात मह्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला पर्यावरण मंत्री रामदास कदम, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.

दरम्यान आतापर्यंत राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी यशस्वीपणे पार पाडली असून आता यापुढे दुकानदारांकडून प्लास्टिक वापरणार नाही असं या प्रतिज्ञापत्रात नमूद करून घेणार असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसेच यापुढे जर दुकानात प्लास्टिकची पिशवी आढळली तर दुकानाचा परवाना रद्द करण्यात येणार असल्याचं कदम यांनी म्हटलं आहे. राज्या शासनाच्या या कडक पावलांमुळे यापुढे आता दुकानदारांना प्लास्टिक पिशवी वापरता येणार नसल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS