राज्यपालांचा महाविकास आघाडी सरकारला दणका, ‘तो’ अध्यादेश फेटाळला !

राज्यपालांचा महाविकास आघाडी सरकारला दणका, ‘तो’ अध्यादेश फेटाळला !

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकासआघाडी सरकारला दुसरा दणका दिला आहे. राज्यपालांनी थेट सरपंच निवडीचा अध्यादेश फेटाळला आहे. सरपंच निवडीबाबतच्या अध्यादेशावर स्वाक्षरी करण्यास कोश्यारी यांनी नकार दिला आहे. कोश्यारी यांनी यापूर्वी विधान परिषदेतील दोन रिक्त जागा भरण्याबाबत सरकारचा प्रस्तावही परत पाठवला होता. च्यीनंतर आता त्यांनी हा अध्यादेश फेटाळल्यामुळे राज्यपाल आणि महाविकासआघाडीत असणारे मतभेद पुन्हा स्पष्ट झाले आहेत.

दरम्यान फडणवीस सरकारने थेट जनतेतून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलत निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय घेतला. जो लागू करण्यासाठी त्याबाबतचाच अध्यादेश राज्यपालांच्या मंजूरीसाठी पाठवला पण राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी केली नाही.त्यामुळे राज्यपालांकडून घेण्यात आलेली ही भूमिका पाहता सरकारला पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचं विधेयक आणावं लागणार आहे.

COMMENTS