दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक !

दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक !

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीर पुलवामा या ठिकाणी सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्याचा निषेध देशभरातून केला जात आहे. या हल्ल्यात 40 हून अधिक जवान जवान शहीद झाले आहते. याबाबत आता पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी देशभरातून केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. उद्या संसदेच्या ग्रंथालयात सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणा आहे.तसेच पुलवामा प्रकरणावर चर्चा करण्यासाठी संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलवण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांची पार्थिवं दिल्लीच्या पालम विमातळावर दाखल झाली आहेत. या ठिकाणाहून ही पार्थिवं जवानांच्या मूळ गावी पाठवण्यात येणार आहेत. या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचीही उपस्थिती होते.

 

COMMENTS