राजीनाम्याचे लोण आता ग्रामपंचायतीपर्यंत !

राजीनाम्याचे लोण आता ग्रामपंचायतीपर्यंत !

हिंगोली – आरक्षणाच्या मागणीवरुन दोन आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील आणखी एका ग्रामपंचायत सदस्यांनं आपला राजीनामा दिला आहे.  औंढा तालुक्यातील नांदखेडा गावच्या पार्वती कदम यांनी ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. मराठा समाजाला लोकशाही मार्गाने आरक्षण मिळत नसल्याने त्यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. मराठा लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवून पार्वती कदम यांनी राजीनामा दिला असून ग्रामसेवकानेही त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती आहे.

दरम्यान कन्नडमधील शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे औरंगाबादमधील वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. सरकारनं मराठा आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घेतला नाही तर आपण राजीनामा देणार असल्याचं कालच हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज हर्षवर्धन जाधव यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. या दोन्ही आमदारांच्या राजीनाम्यानंतर आता ग्रामपंचायत सदस्यानंही राजीनामा दिला असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

COMMENTS