पुणे जिल्ह्यातील 76 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान !

पुणे जिल्ह्यातील 76 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान !

पुणे – पुणे जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 76 ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. तर सोमवारी मतमोजणी केली जाणार आहे. जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 90 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी बिनविरोध झालेल्या 12 ग्रामपंचायती वगळता उर्वरित 76 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामस्थांनी आपला मतदानाच हक्क बजवावा, असे आवाहन निवडणूक आयोगाच्यावतीने करण्यात आले आहे. प्रशासनाच्य वतीने निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं असून सर्व साहित्यासह मतदान केंद्रावर त्यांना पाठवण्यात आलं आहे.

दरम्यान जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतींपैकी 12 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आणि सदस्यपदाच्या 834 जागांपैकी 268 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे तर एकही अर्ज न दाखल झाल्याने सरपंचपदाच्या दोन आणि सदस्यपदाच्या 78 जागा रिक्त राहिल्या आहेत. उर्वरित 76 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी मतदान होत असून यामध्ये सरपंचपदासाठी 226 आणि ग्रामपंचायत सदस्यपदाच्या 488 जागांसाठी 1160 उमदेवार निवडणूक रिंगणात आहेत.

 

COMMENTS