शुन्याचे शंभर करण्याची धमक ठेवली

शुन्याचे शंभर करण्याची धमक ठेवली

यवतमाळ – राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये किंगमेकर असलेल्या राष्ट्रवादीची उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ताकद कमी असून या परिसरात राष्ट्रावादीने संवाद यात्रा सुरू केली आहे. या यात्रेदरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सध्याची वस्तुस्थिती स्विकारून भविष्यातील पक्षाच्या दिशा निश्चित करण्याचा निर्धार केला. त्यादृष्टीकोनातून कार्यकर्तयांना मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले, जे खरं आहे ते स्वीकारून शुन्याचे शंभर करण्याची धमक आपण ठेवली आहे. शरद पवार यांच्या विचारांचा हा पक्ष आहे. त्यामुळे एकजुटीने पक्ष वाढविण्यासाठी कामाला लागा.” असे आवाहन केले

राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा यात्रा यवतमाळमध्ये पोहचली असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणी बैठक घेतली होती. यावेळी यवतमाळ जिल्हाध्यक्ष व माजी आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदिप बाजोरिया, आमदार इंद्रनील नाईक, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील, राजेंद्र बढिये आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

या वेळी जयंत पाटील म्हणाले, “मला रॅलींची अपेक्षा नाही. मी पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. आपल्या सर्वांना मिळून हा पक्ष बांधायचा आहे. जे खरं आहे ते स्वीकारले पाहिजे.”

COMMENTS