‘GST’मुळे शेतक-यांना काहीसा दिलासा देणारी बातमी

‘GST’मुळे शेतक-यांना काहीसा दिलासा देणारी बातमी

संपूर्ण देशभरात जीएसटी लागू होण्यापूर्वी जीएसटी काऊन्सिलने एक मोठा निर्णय घेतला आहे. जीएसटी परिषदेने फर्टिलायजरवरील करात मोठ्या प्रमाणावर कपात केली आहे. हा कर 12 % वरून 5 % करण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जीएसटीमध्ये रासायनिक खतांना 12 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये ठेवण्यात आल्यामुळे देशभरातून विविध प्रतिनिधींनी हा कर कमी करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता, रासायनिक खतांवर आकारण्यात आलेला 12 टक्के कर रद्द करुन तो आता 5 टक्के करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता राज्यांमध्ये जीएसटीनुसार फर्टिलायजरवर कमीत कमी 0 ते 6 टक्क्यांपर्यंतचा कर आकारला जाणार आहे. रासायनिक खतांवरील कर कमी करण्यात आल्याने त्याचा फायदा शेतक-यांना होणार आहे.

जीएसटी लागू झाल्यानंतर फर्टिलायजरवरील कर 12 टक्के होणार होता. त्यामुळे शेतीशी निगडीत सर्व साधने महाग होणार असल्याने त्याचा फटका बसणार होता. मात्र, आता जीएसटी परिषदेने घेतलेल्या निर्णयामुळे खत, बी-बियाणे, टॅक्टरचे सुटे पार्ट यापासून ते शेतीसाठी लागणा-या अवजारे स्वस्त होणार आहेत.

COMMENTS