गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, उमेदवारांमध्ये बदल

गुजरात निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, उमेदवारांमध्ये बदल

काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी 13 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती. काँग्रेसने काल घोषित केलेल्या यादीतून चार नावे बदलली आहेत.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या 182 जागांसाठी 9 डिसेंबर व 14 डिसेंबर या दोन टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी 18 डिसेंबर रोजी होईल. काँग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर सोमवारी 13 उमेदवारांची दुसरी यादी घोषित केली.
आता जूनागड मतदारसंघातून अमित ठुम्मर यांच्याजागी भीखाभाई जोशी, भरुचमधून किरण ठाकोरच्या जागी जैश पटेल, कामरेजमधून निलेश कुंबानी यांच्याजागी अशोकर जीरावाला आणि वरोछा रोड मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रभुल्ल भाई तोगडिया यांच्याजागी धीरूभाई गजेरा निवडणूक रिंगणात उतरतील.

अन्य नऊ उमेदवार पुढील प्रमाणे – 

अबदास मतदारसंघातून प्रद्युम्न सिंह जडेजा, भुजमधून आदम बी चाकी, रापारमधून संतोक अरेथिया, राजकोट मतदारसंघातून मिथुल डोंगा, राजकोट दक्षिण मतदारसंघातून दिनेश चोवातिया, जामनगर उत्तरमधून  जीवन कुंभरवादिया, जामनगर दक्षिणी मतदारसंघातून अशोक लाल, खांभालियामधून विक्रम मदाम आणि द्वारका मतदारसंघातून मेरामन गारिया.

COMMENTS