गुजरातमध्ये भाजपला पुन्हा धक्का, नगरपालिका निवडणुकीत कामगिरी घसरली !

गुजरातमध्ये भाजपला पुन्हा धक्का, नगरपालिका निवडणुकीत कामगिरी घसरली !

गुजरात – गुजरातमध्ये भाजपला पुन्हा एकदा धक्का बसला असून नगरपालिका निवडणुकीत भाजपची कामगिरी घसरली असल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने राज्यातील 75 नगरपालिकांपैकी 47 जागांवर विजय मिळविला आहे. तर काँग्रेसने 16 जागा जिंकल्या आहेत. सहा जागांवर एकाही उमेदवाराला बहुमत मिळाला नसून अपक्ष उमेदवारांनी चार जागांवर विजय मिळवला आहे तर इतर दोन जण विजयी झाले आहेत.

दरम्यान 2013 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत भाजपला 75 नगरपालिकांपैकी 59 नगरपालिकांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसने 11 महापालिका आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. परंतु यावर्षी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपची घसरण झाली असून फक्त 47 नगरपालिकांवर भाजपला आपली सत्ता कायम ठेवता आली आहे. तर दुस-या बाजूला काँग्रेसनं मात्र मागच्या निवडणुकीपेक्षा 5 नगरपालिकांची सत्ता आपल्या पारड्यात पाडून घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसह नगरपालिकांच्या निवडणुकीतही भाजपची घसरण दिसून येत आहे.

COMMENTS