गुजरातमध्ये आम आदमी पार्टीपेक्षा ‘नोटा’ला तिप्पट मते !

गुजरातमध्ये आम आदमी पार्टीपेक्षा ‘नोटा’ला तिप्पट मते !

अहमदाबाद – गुजरातमध्ये अतितटीच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. तर काँग्रेसनंही त्यांची टॅली सुधारली आहे. मात्र इतर पक्षांची अतिशय दयनिय अवस्था झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एका जागेवर विजय मिळाला असला तरी त्यांची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. शिवसेनेच्याही सर्व उमेदावारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. त्याच्यापेक्षाही खराब कामगिरी आम आदमी पार्टीची झाली आहे.

आम आदमी पार्टीने गुजरातमध्ये 29 उमेदवार उभे केले होते. त्यातील सर्व उमेदवारांचं अनामत रक्कम जप्त झाली. त्यातील 16 उमेदवारांना तर 500 पेक्षा कमी मते मिळाली. विशेष म्हणज्ये ज्या जागांवर आपचे उमेदवार होते त्या 29 जागांवर मिळून पक्षाला फक्त 29 हजार मते मिळाली आहेत. तर याच 29 जागांवर नोटाला तब्बल 75880 मते मिळाली आहेत. देशभरात काँग्रेस आणि भाजपला पर्याय देण्याच्या बाता करणा-या आम आदमी पार्टीला हा मोठा धक्का मानला जातोय. आता त्याच्यातून पक्ष बाहेर कसा येतो ते पहावं लागेल.

COMMENTS