गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील आघाडी जवळपास निश्चित !

गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील आघाडी जवळपास निश्चित !

नाशिक – गुजरातमध्ये सुरूवातीला स्वबळाचा नारा देणा-या राष्ट्रवादी काँग्रेसने आता काँग्रेससोबत जुळवून घेण्याचे धोरण स्विकारले आहे. गुजरातची जबाबदारी असलेले प्रफुल्ल पटेल यांना यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस गुजरातमध्ये स्वबळावर सुमारे 50 जागा  लढवेल अशी गर्जना केली होती. ती गर्जना हवेत विरलेली दिसत आहे. गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस  काँग्रेसोबत आघाडी करणार असल्याची माहिती पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी काल नाशिकमध्ये केली. तसंच राष्ट्रवादी काँग्रे गुजरातमध्ये 9 ते 10 जागा लढवणार असल्याचंही पवार म्हणाले.

काही वस्तुंवरील जीएसटी कमी करण्याच्या सरकारच्या निर्णवरही पवार यांनी टीका केली. केवळ गुजरात निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं पवार म्हणाले. व्यापारी वर्गातील आणि सर्वसामान्य जनतेमधून रोष वाढत असल्यामुळे सरकारने निर्णय घेतला असल्याचं सांगत याचा भाजपला निवडणुकीत फायदा होणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

COMMENTS