“मनसे नावाची पार्टी राहिलीच कुठे? तुमच्याकडे दिसते तरी थोडी, आमच्याकडे तर लोणच्यालाही नाही !”

“मनसे नावाची पार्टी राहिलीच कुठे? तुमच्याकडे दिसते तरी थोडी, आमच्याकडे तर लोणच्यालाही नाही !”

नाशिक – शिवसेना नेते आणि ठाकरे मंत्रिमंडळातील नवनिर्वाचित पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे नसतं, तर ते संगीतकारांमध्ये दिसले असते. राज्याचा कॅबिनेट मंत्री पानवाला आहे. ही किमया वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच केली जाते. मनसे नावाची पार्टी राहिलीच कुठे आहे? ही तुमच्याकडे नाशिकमध्ये दिसते तरी थोडी, आमच्याकडे तर लोणच्यालाही नाही. अशी जोरदार टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. नाशिकमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी ते बोलत होते.

दरम्यान ज्यांनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे. यांचं सरनेम, यांच्या नेत्याचं नाव जर ठाकरे नसतं, तर कुठेतरी संगीतकारांमध्ये दिसले असते. त्यामुळे ठाकरे आडनावाचं वलय त्यांच्याकडे दिसतंय.भाजपने नोटबंदी करुन फसवणूक केली आणि आता म्हणता हे सरकार चालणार नाही? म्हणजे तुम्ही कोणाशीही युती केलेली चालते आणि आम्ही केलेली का नाही चालत नाही? असा प्रश्न गुलाबरावांनी विरोधकांना विचारला. नाशिकमधील प्रभाग क्र. 26 च्या पोटनिवडणुकीत उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकरराव जाधव यांच्या प्रचारासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नाशिकमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

COMMENTS