माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा उस्मानाबादमध्ये, जनता दल सेक्यलरचं दोन दिवशीय शिबीर !

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा उस्मानाबादमध्ये, जनता दल सेक्यलरचं दोन दिवशीय शिबीर !

उस्मानाबाद  – जनता दल (सेक्युलर)चे सर्वेसर्वा अन माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहे. पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष अँड. रेवन भोसले यांनी दोन दिवशीय कार्यकर्ता शिबिराचे आयोजन केले आहे. शनिवारी (ता. २७) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शरद पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होत आहे. शहरातील शुभमंगल कार्यालयात हे शिबीर होणार आहे.

समाजवादी विचाराची गरज आणि संघटन या विषयावर प्रा. सोमनाथ रोडे मार्गदर्शन करणार आहेत. तर विजेच्या स्थानिक समस्या आणि उपाय यावर प्रताप होगाडे, भारतीय संविधान या विषयावर माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. मोदी सरकारची चार वर्षे या विषयावर नीरज जैन (पुणे), अँड. मनोहरराव गोमारे समविचारी पक्षाचे संघटन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिराचा समारोप श्री. देवगौडा यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात दोन दिवस राजकीय पक्षांची धुम पाहायला मिळणार आहे. अँड. कुलदिपसिंह भोसले यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.

COMMENTS