हर्षवर्धन पाटलांचा भाजपला पाठिंबा?, विजयसिंह मोहीते पाटलांनी घेतली भेट!

हर्षवर्धन पाटलांचा भाजपला पाठिंबा?, विजयसिंह मोहीते पाटलांनी घेतली भेट!

इंदापूर –  बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांना समर्थन देण्याच्या मुद्द्यावरून माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे भाजपला पाठिंबा देतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी हर्षवर्धन पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. तुम्ही लोकसभेला मदत करा, आम्ही विधानसभेला मदत करू असं आश्वासन अजित पवारांनी पाटील यांना दिलं होतं. त्यानंतर आज मोहीते पाटलांनी त्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील हे कोणाला मदत करणार हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS