डॉ. बाबासाहेबांवरील वादग्रस्त ट्वीट भोवलं, हार्दिक पंड्यावर गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश !

डॉ. बाबासाहेबांवरील वादग्रस्त ट्वीट भोवलं, हार्दिक पंड्यावर गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश !

जोधपूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर वादग्रस्त ट्वीट केल्याप्रकरणी क्रिकेटर हार्दिक पंड्याच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे. पंड्याविरोधात अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश जोधपूरच्या एका न्यायालयाने दिले आहेत. हार्दिक पंड्याने २६ डिसेंबर २०१७ रोजी आपल्या ट्विटर अकाऊंटवर डॉ. आंबेडकर यांच्याबाबत एक पोस्ट केली होती. यामध्ये त्याने ‘कोण आंबेडकर ? जिने देशाच्या संविधानाचा मसूदा तयार केला. आणि त्यामध्ये देशाला आरक्षण नावाचा आजार दिला’. या ट्वीटनंतर पंड्याविरोधात डी. आर. मेघवाल यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मेघवाल यांच्या म्हणण्यानुसार, पंड्याने आंबेडकरांचा अपमान केला असून दलित समाजाच्या भावनाही दुखावल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पंड्यासारख्या प्रसिद्ध क्रिकेटरने अशा प्रकारचं ट्वीट करुन केवळ संविधानाचाच नाही तर दलित समाजाचाही अपमान केला असून त्यांच्या भावना दुखावल्या असल्याचं राष्ट्रीय भीम सेना संघटनेचे सदस्य मेघवाल यांनी म्हटलं आहे. त्याबाबत त्यांनी हार्दिक पंड्याविरोधात याचिकाही दाखल केली आहे.

 

 

 

COMMENTS