“…त्यामुळेच मी निर्णय घेतला”, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा राजकीय संन्यास !

“…त्यामुळेच मी निर्णय घेतला”, माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा राजकीय संन्यास !

औरंगाबाद – कन्नडचे माजी आमदार आणि भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकून आपला निर्णय जाहीर केला.
त्यांनी आपल्या पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचा खुलासा या व्हिडीओत म्हटलं आहे.
हर्षवर्धन जाधव गेल्या काही दिवसांपासून राजकीय आणि कौटुंबिक कलहामुळे चर्चेत होते. अखेर हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं आहे. हर्षवर्धन जाधव दोन वेळा कन्नडचे आमदार राहिले आहेत. सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या पराभवामुळे ते अस्वस्थ झाले होते. त्यानंतर आज अखेर त्यांनी आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत याची मला जाणीव झाली. त्यामुळेच मी निर्णय घेतला आहे की, आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी ही माझी पत्नी संजना जाधव असेल. आपल्याला जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण संजनाकडून सोडवून घ्यावे, अशी मी विनंती करतो”, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत. प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात. आमच्याही घरात झाल्या. पण त्यामुळे काही वेगळ्या गोष्टी घडत असतील, असा त्याचा अर्थ नाही. मी संजना जाधव यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. रायभान जाधव यांच्या आशीर्वादाने आणि केंद्रीय मंत्री राबसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली संजना निश्चतच उत्तुंग भरारी घेईल, याबाबत शंका नाही असंही ते म्हणाले आहेत.

COMMENTS