दिग्गज नेत्याला जावयानेच दिलं चॅलेज

दिग्गज नेत्याला जावयानेच दिलं चॅलेज

पुणे – महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याचा संघर्षाची परंपरा आहे. त्यानंतर भाऊ विरुध्द भाऊ किंवा बहिण अशा संघर्षाला सुरुवात झालेली पाहिलं. मात्र, मराठवाड्यातील एका दिग्गज नेत्याला मागील काही वर्षांपासून त्यांच्या जावयाने वेगवेगळ्या उचापती करून जेरीस आणले आहे. सध्या कारागृहातून जामीनावर आल्याल्या सासऱ्याचा पराभव करण्याचा पन केला.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई म्हणजे कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पुण्यात साधारण दोन महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. याप्रकरणी जामीन मिळावा अशी मागणी त्यांनी न्यायालयात केली होती. जामीन मिळून बाहेर आल्यानंतर त्यांनी सर्व प्रकरणावर भूमिका मांडली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

हर्षवर्धन जाधव म्हणाले, “रावसाहेब दानवे यांनी आजवर माझ्यावर केंद्राच्या सत्तेचा वापर करून गुन्हे दाखल केले आहेत हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्याच दरम्यान एकदा रावसाहेब दानवे मला एकदा म्हणाले होते की, तुला नाक घासत आणले नाही, तर रावसाहेब दानवे नाव सांगणार नाही. अशी मस्ती त्यांच्यामध्ये दिसून येते. त्यामुळे त्यांना कटाक्ष भावनेने सांगतो की, पुढील जालना लोकसभा मतदारसंघात पाडून दाखविल्याशिवाय राहणार नाही. नाही तर मी माझ्या बापाची अवलाद नाही,” असे हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत.

“आजवर अनेक घटनांमधून रावसाहेब दानवे यांचे नाव पुढे येत असून केंद्राच्या सत्तेचा पुरेपूर वापर करून गुन्हे दाखल केले गेले आहेत. या सर्व घटना लक्षात घेता. मला आणि माझी सहकारी दोघांना बाहेर पडताना एक भीती वाटते. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आमच्या सारख्यांना संरक्षण द्यावे,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

COMMENTS