हर्षवर्धन जाधवांचा नवा पक्ष, लवकरच करणार घोषणा !

हर्षवर्धन जाधवांचा नवा पक्ष, लवकरच करणार घोषणा !

कोल्हापूर – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजीनामा दिलेले आणि शिवसेनेवर नाराज असलेले आमदार हर्षवर्धन जाधव हे नवा पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत. याबाबत जाधव यांनी कोल्हापुरात माहिती दिली असून आरक्षणावरुन समाजात बिघडत चाललेल्या परिस्थितीला रुळावर आणण्यासाठी आपण नवीन राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं आहे. यापुर्वीही त्यांनी स्वतंत्र पक्ष काढण्याचे संकेत दिले होते. परंतु यावेळेस त्यांनी आपण पक्ष काढणार असल्याचं जाहीर केलं असून लवकरच घोषणा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान येत्या 27 ऑगस्टरोजी मुंबईमध्ये जाधव यांनी बैठक बोलावली असून या बैठकीला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर लगेचच आपण पक्षाची घोषणा करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्या नव्या पक्षाचं नाव काय असणार याबाबत राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS