रावसाहेब दानवेंनी जावई धर्म पाळला का ?, हर्षवर्धन जाधव यांची प्रतिक्रिया !

रावसाहेब दानवेंनी जावई धर्म पाळला का ?, हर्षवर्धन जाधव यांची प्रतिक्रिया !

औरंगाबाद – औरंगाबादमधील शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांची बुद्धी भ्रष्ट झाली असल्याची टीका लोकसभेचे अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. चंद्रकांत खैरे यांचं वय झालं आहे. त्यांना चेकअपची गरज आहे. पराभवाच्या छायेत असल्यामुळे  खैरे यांची बुध्दी भ्रष्ट झाली असल्याचं जाधव यांनी म्हटलं आहे. तसेच खैरै यांना माझं चॅलेंज आहे. सासऱ्यांनी मला 50 लाख दिले हे सिध्द केले तर मी सांगेल ते करायला तयार असल्याचंही जाधव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युती धर्माऐवजी जावई धर्म पाळला, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता त्यानंतर जाधव यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. खैरे ज्या नेत्यांनी मदत केली असे सांगतात ते दानवे यांचे जवळचे नेते आहेत, मला सासूने ना मदत केली ना सासऱ्याने. मी रावसाहेब दानवे यांच्या जावयाच्या आधी रायभान जाधव यांचा मुलगा आहे. त्यामुळे ही निवडणूक मी स्वतःच्या जीवावर लढलो आहे, असेही जाधव यांनी म्हटलं आहे.

COMMENTS