मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांची व्हिडीओ क्लीप व्हायरल, ऐका काय म्हणाले जाधव ?

मराठा आरक्षणासंदर्भात शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांची व्हिडीओ क्लीप व्हायरल, ऐका काय म्हणाले जाधव ?

मुंबई – शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांची मराठा आरक्षणासंदर्भातली व्हिडीओक्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये जाधव यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.  ‘मला एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावरून फोन आला, की हर्षवर्धन तू आरक्षणावर बोलू नको’. परंतु मला वाटलं होतं की आरक्षणाला शिवसेना पाठिंबा दे म्हणेन परंतु असं झालं नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष चोर असल्याचंही हर्षवर्धन जाधव यांनी यामध्ये म्हटलं आहे. तसेच आपला स्वतःचा पक्ष काढला पाहिजे असंही त्यांनी मराठा बांधवांना या क्लिपमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान गेल्या सोमवारी हर्षवर्धन जाधव ‘मातोश्री’ उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते, पण त्यांना भेट मिळू शकली नव्हती. त्यानंतर मात्र ठाकरेंनी पक्षातील मराठा समाजाच्या आमदारांशी एकूण परिस्थितीवर चर्चा केली होती. पत्रकार परिषदेत ठाकरे यांना हर्षवर्धन जाधव यांनी दिलेल्या आमदारकीच्या राजीनाम्यासंदर्भात प्रश्न विचारला होता. त्यावर उद्धव यांनी राजीनामा देऊन काय होणार आहे ? त्यापेक्षा विशेष अधिवेशनात भूमिका मांडणं जास्त गरजेचं असल्याचं म्हटलं होतं.

COMMENTS