त्यामुळेच हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली ?

त्यामुळेच हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली ?

मुंबई – माजी मंत्री आणि काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस की राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार यावरून सध्या राजकीय वाद सुरु आहे.
त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला सुटला नाही तर हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यामुळेच हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
आलं आहे.

दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी लिहिलेल्या ‘विधानगाथा’ पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी पाटील आपल्या कुटुंबासमवेत मुख्यमंत्र्यांना काल भेटले असल्याची माहिती आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील जिल्हा परिषद सदस्या झाल्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदनही केले. परंतु सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. असे असताना
हर्षवर्धन पाटील यांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट चर्चेचा विषय ठरत आहे.

COMMENTS