विधानसभा पोटनिवडणूक, दोन्ही मतदारसंघाचा निकाल, वाचा कोणी कुठे मारली बाजी ?

विधानसभा पोटनिवडणूक, दोन्ही मतदारसंघाचा निकाल, वाचा कोणी कुठे मारली बाजी ?

जयपूर – राजस्थानमधील रामगड आणि जिंद या दोन्ही विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली. या दोन्ही मतदारसंघाचा निकाल हाती आला असून  रामगढमध्ये भाजपला धक्का बसला असून काँग्रेसच्या साफिया खान १२,२२८ मतांनी विजयी झाल्या आहेत. खान यांच्याविरोधातील भाजपच्या सुवंत सिंह यांना ७१ हजार ८३ मते मिळाली तर खान यांना ८३ हजार ३११ मते पडली आहेत.

तर दुसरीकडे हरियाणामधील जिंद विधानसभा पोटनिवडणुकीचा निकालही हाती आला असून या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाला आहे. भाजपचे कृष्ण मिद्धा यांचा तब्बल 12000 हजार मतांनी विजय झाला आहे.

या मतदारसंघात काँग्रेसतर्फे रणदीपसिंह सुरजेवाला रिंगणात होते तर जननायक पार्टी आणि राष्ट्रीय लोकदल या पक्षाचेही उमेदवार रिंगणात होते. या दोन्ही उमेदवारांवर मात करत भाजपनं 12000 हजार मतांनी विजय मिळवला आहे. दरम्यान काँग्रेस आणि जननायक जनता पक्षांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे. ईव्हीएममध्ये फेरफार करण्यात आल असल्याचा आरोप दोन्ही पक्षांनी केला आहे.

COMMENTS