कोल्हापूर – माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना गावक-यांकडून धक्काबुक्की ! VIDEO

कोल्हापूर – माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना गावक-यांकडून धक्काबुक्की ! VIDEO

कोल्हापूर – माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथे दूषित पाण्याच्या कारणावरुन मुश्रीफ यांना धक्काबुक्की करण्यात आली असल्याची माहिती आहे. याठिकाणी दुषित पाण्याच्या प्रश्नामुळे नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं पहावयास मिळालं आहे. पाण्याच्या तीव्र झळा येथील नागरिकांना बसत असून याची पाहणी करण्यासाठी मुश्रीफ हे कागल येथे गेले होते.

 

यावेळी संतप्त गावक-यांनी मुश्रीफ यांनाच धक्काबुक्की केली असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तसेच आक्रमक झालेल्या काही गावक-यांनी मुश्रीफ यांच्या दिशेनं पाण्याने भरलेली भांडी देखील भिरकावली असल्याचं पहावयास मिळालं आहे. गावक-यांची आक्रमकता पाहून मुश्रीफ यांनी लागलीच घटनास्थळावरुन काढता पाय घेतला आहे.

 

COMMENTS