धनगर समाजाचा विश्वासघात केल्यानेच पडळकरांना आमदारकी- मुश्रीफ

धनगर समाजाचा विश्वासघात केल्यानेच पडळकरांना आमदारकी- मुश्रीफ

कोल्हापूर : धनगर समाजाचा विश्वासघात केल्याचे बक्षीस म्हणून पडळकर यांना आमदार करण्यात आले आहे. पडळकर जरी बोलत असले तरी त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे त्यांना आवरा, असा इशाराही ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.

खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे चमचे आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला होता. याबाबत विचारले असता मंत्री मुश्रीफ यांनी पडळकर यांचा खरपूस समाचार घेतला. सहा वर्षापूर्वी पडळकर यांनी बारामती येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनाच्यावेळई भाजपच्या नेत्यांनी सरकार येताच पहिल्याच दिवशी धनगर समाजाला आरक्षण देऊ अशी घोषणा केली होती. पण पाच वर्षे त्यांनी हे आरक्षण दिले नाही. मात्र, पडळकर विधान परिषदेवर आमदार झाले. आश्वासन पूर्ण केले नसतानाही त्यांना आमदारकी मिळाली यावरून ते कोणाचे चमचे आहेत हे स्पष्ट होते, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी पडळकरांना सुनावले.

COMMENTS