धनंजय मुंडेंच्या बंगल्यात शिरलं पाणी, पाहा व्हिडीओ !

धनंजय मुंडेंच्या बंगल्यात शिरलं पाणी, पाहा व्हिडीओ !

नागपूर – नागपुरात कालपासून पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाचा जोरदार फटका पावसाळी अधिवेशनाला बसला असल्याचं दिसत आहे. अधिवेशनाचा अजचा तिसरा दिवस होता. यादरम्यान काल रात्रीपासून पडलेल्या पावसामुळे विधीमंडळात पाणी साचले होते. साचलेल्या या पाण्यामुळे विधीमंडळातील वीजही गायब झाली आहे. त्यामुळे विधीमंडळाचं कामकाज आज दिवसभरासाठी ठप्प करण्यात आलं. एवढच नाही तर विधीमंडळ परिसरातही ठिकठिकाणी पाणी साचलं असून गुडघाभर पाण्यातून प्रवास करण्याची वेळ आमदारांवर आली आहे.

दरम्यान याचा फटका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या सहका-यांनाही बसला असल्याचं दिसून आलं आहे. कारण धनंजय मुंडे यांच्या सरकारी निवासस्थानात पाणी शिरलं असल्याचं पहावयास मिळालं आहे. बंगल्यातच पाणी शिरल्यामुळे मुंडे आणि त्यांच्या सहका-यांना चांगलाच मनस्ताप सहन कारावा लागला.

यानंतर धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली असून अडीच तासाच्या पावसात व्यवस्था कोसळत असेल तर हे सरकार महाराष्ट्र काय सांभाळणार असा सवाल त्यांनी केला आहे.

COMMENTS