राज ठाकरे भाजपसोबत?

राज ठाकरे भाजपसोबत?

मुंबई – शिवसेनेने भाजपशी अनेक वर्षांची युती तोडून काॅंग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी केली. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात भाजपने एकला चालो रे अशी वाटचाल सुरू आहे. भाजप नव्या दोस्ताच्या शोधात असून मागील काही दिवसांपासून मनसेशी युती करणार अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या पत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज ठाकरे हे भाजपसोबत जवळीक करण्याच्या तयारीत आहेत का? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

“आपली मराठी भाषा ही इतकी लेचीपेची अजिबात नाही की जिच्यासाठी आसवं गाळत बसावी. ही भाषा कोणाकोणाच्या मुखातून निघाली आहे याचा विचार केला तर ही भाषा किती सशक्त आहे हे तुमच्या लक्षात येईल. हिंदवी स्वराजाच्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखी असलेली ही भाषा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते समर्थ रामदास स्वामींच्या मुखी असलेली ही भाषा. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ म्हणत भारतीयांच्या मनात स्वराज्याचं बीज रोवणाऱ्या लोकमान्य टिळकांची ही भाषा, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुखी असलेली ही भाषा, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकराची ही मातृभाषा, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, इतकंच काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेगडेवार असोत की भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगेंची पण ही मातृभाषा. लता दीदींच्या आणि आशाताईंच्या गोड गळ्यातून पहिले शब्द जे निघाले ते याच भाषेतले आणि १८४३ पासून आजपर्यंत अव्याहतपणे ज्या रंगभूमीने जागतिक रंगभूमीलादेखील दखल घ्यायला लावली ती देखील माराठी भाषिक रंगभूमीच. भारत व्यापून टाकणारं कार्य करणारी ८ भारतरत्नही ह्या मराठी भूमीतीलच. “असा उल्लेख राज ठाकरे यांच्या पत्रात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पत्रात सगळ्यांची नावं घेतली आहेत. त्यातलं हेगडेवारांचं नाव हे विशेष चर्चेचा विषय ठरतं आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच एक पत्रही त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केलं आहे. २७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा वाढदिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. सरकारी कॅलेंडरमधले जसे अनेक दिवस निरसपणे साजरे केले जातात तसा हा दिवस पण साजरा केला जात होता. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा दिवस मोठ्या उत्साहा साजरा करण्यास सुरूवात केल्यानंतर आपल्या मराठी भाषेचा गौरव करणारा दिवस सर्वांच्या स्मरणात राहू लागला. असंही राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.

COMMENTS