हल्लेखोरांवर ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करा – हीना गावित

हल्लेखोरांवर ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करा – हीना गावित

नवी दिल्ली – भाजप खासदार हीना गावित यांच्या गाडीवर काल धुळ्यात मराठा आंदोलकांनी हल्ला केला होता. त्या पार्श्वभूमीवर हीना गावित यांनी गाडीवर हल्ला करणा-या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी आली आहे. आज लोकसभेत त्यांनी अध्यक्षांकडे हल्लेखारांना तातडीनं पकडण्यात यावं. तसेच तेथील एसपींना निलंबित करुन ऍट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान आज गावित यांना लोकसभा अध्यक्षांनी त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली. त्यावेळी गावित यांनी काल झालेल्या हल्ल्याचा तपशील सांगितला.तसेच सभागृहात हल्ल्याच्या घटनेचे छायाचित्रेही दाखवली. त्यानंतर हल्ल्यानंतर हल्लेखोरांना लगेच सोडून देण्यात आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. एका हल्लेखोरांची विजयी मिरवणूक काढण्यात आल्याचा फोटोही हिना गावित यांनी यावेळी लोकसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आणला.तसेच गावित हल्ला होत असताना पोलिसांनी बघ्यांच्या भूमिका घेतली असल्याचा आरोपही हीना गावित यांनी केला आहे.

COMMENTS