नवनियुक्त सरपंचाच्या एन्ट्रीने गाव झालं आवाक्

नवनियुक्त सरपंचाच्या एन्ट्रीने गाव झालं आवाक्

अहमदनगर : काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक गावांमध्ये निवडणुका पार पडल्या. यामधील सरपंच निवडीही दोन दिवसांपूर्वी झाल्या. सरपंच पदासाठी विविध शक्कल लढवून पद मिळवून घेतले. सरपंच पदाचा पदभार स्विकारताना गुलाल, फटाके आदींचा वापर करून जल्लोष साजरा केला. मात्र, अंगावर शहारा आणणारं हे दृश्य जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पाहायला मिळालं. विशेष म्हणजे सरपंचसाहेबांनी शपथ घेण्यासाठी थेट हेलिकॉप्टरनेच एन्ट्री घेतली.

सरपंचांचे हेलिकाॅप्टरने आगमन सोहळा पाहण्यासाठी गाव लोटला होता. असा नयनरम्य सोहळा आज अहमदनगर जिल्ह्यात रंगला होता. एखाद्या मुख्यमंत्र्याला लाजवेल असा सरपंचसाहेबांचा शपथविधी पार पडला. सरपंचांचे हेलिकाॅप्टरने आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आलं. बारा बैलाच्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली.

संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात हा शपथविधी सोहळा रंगला होता. गावातील उद्योजक तरूण जालींदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. योगायोगाने सरपंचपद सर्वसाधारण पुरूषाचे निघाल्याने जालिंदर गागरे आज सर्वानुमते सरपंचपदी विराजमान झाले आहेत. ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडतो, तशाच पद्धतीने आज ग्रामपंचायत सदस्य आणी सरपंच उपसरपंच यांनी गावच्या विकासाची शपथ घेतली.

COMMENTS