मराठा समाजाच्या तीव्र आंदोलनाची हायकोर्टानं घेतली दखल !

मराठा समाजाच्या तीव्र आंदोलनाची हायकोर्टानं घेतली दखल !

मुंबई – राज्यामध्ये गेली काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीवर मराठा समाजाचं तीव्र आंदोलन सुरु आहे. दिवसेंदिवस आंदोलनाचा भडका वाढत असल्यामुळे याची दखल आता उच्च न्यायालयानं घेतली आहे. मराठा आरक्षणाची सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला घेण्याचा निर्णय हायकोर्टानं घेतला आहे. राज्यातील तीव्र आंदोलन तसेच मराठा समाजातील तरुणांच्या वाढत्या आत्महत्या यांची दखल हायकोर्टानं घेतली आहे.

दरम्यान परळीमध्ये गेल्या 16 दिवसांपासून मराठा समाजाचं आंदोलन सुरु आहे. सरकारकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा या आंदोलकांनी घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चाची बैठक काल परळी येथे पार पडली. या बैठकीदरम्यान राज्य सरकारनं मराठा आरक्षणाबाबत 7 ऑगस्टपर्यंत निर्णय घ्यावा अन्यथा 9 ऑगस्टला राज्यभरात रस्त्यावर उतरण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे. तसेच अनेक ठिकाणी तीव्र आंदोलन करत जाळपोळ केली जात आहे. याचीच दखल हायकोर्टानं घेतली असून 14 ऑगस्टऐवजी 7 ऑगस्टलाच सुनावणी घेण्याचा निर्णय हायकोर्टानं घेतला आहे.

COMMENTS