भीमा कोरेगावप्रकरणी पुरावे सादर करा, अन्यथा एफआयआर रद्द करु, कोर्टाची सरकारला सक्त ताकीद !

भीमा कोरेगावप्रकरणी पुरावे सादर करा, अन्यथा एफआयआर रद्द करु, कोर्टाची सरकारला सक्त ताकीद !

मुंबई – भीमा कोरेगाव प्रकरणी पुरावे सादर करा, अन्यथा एफआयआर रद्द करु अशी सक्त ताकीद कोर्टानं राज्य सरकारला दिली आहे. तसेच हे सर्व पुरावे सर्वोच्च न्यायालय पाहिल असंही कोर्टानं म्हटलं आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी आज सुनावणी पार पडली त्यावेळी कोर्टानं सरकारला फटकारलं आहे. यावेळी सरकारनं आपली बाजू मांडली असून भीमा कोरेगांव प्रकरणी आमच्याकडे ठोस पुरावे आहेत.लॅपटॉप, हार्ड डिस्कमधून हे पुरावे मिळाले आहेत. जे कागदपत्रे मिळाले आहेत त्यांची रेकॉर्डिॅग करण्यात आली असून संशयीतांकडे सापडलेली सामुग्री देशाची शांतता बिघडवणारी आहे. असा युक्तीवाद महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात मांडला आहे.

दरम्यान या याचिकेवर सुनावणी घेऊ नये अशी विनंती महाराष्ट्र सरकारने न्यायालयाला केली आहे. यावेळी सरकारकडे पुरावे असतील तर न्यायालयात सादर करा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत.  तसेच या प्रकरणी एसआयटीद्वारे तपासाची गरज असल्याची विनंती याचिकाकर्त्याने न्यायालयात केली आहे.

दरम्यान भीमा कोरेगांव प्रकरणी पुन्हा बुधवारी सुनावणी होणार असून बुधवारपर्यंत संशयीत आरोपींना नजर कैदेत ठेवले जाईल, व्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरूनच त्यांचे म्हणणे ऐकले असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सरकारला संगितले आहे. तसेच यावेळी नक्षलवाद हे गंभीर प्रकरण असून अशा याचिकांची सुनावणी घेतली तर चुकीचा पायंडा पडेल त्यामुळे अशा याचिका रद्द करायला पाहिजे अशी विनंत सरकारी वकील तुषार मेहता यांनी न्यायालयाकडे केली आहे.

 

COMMENTS