गृहमंत्र्यांचे गुन्हेगारांसोबत फोटो सेशन

गृहमंत्र्यांचे गुन्हेगारांसोबत फोटो सेशन

औरंगाबाद : गुटखा किंग, ड्रग्ज, बलात्कार आणि चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींनी औरंगाबादमध्ये राज्याचे गृहमत्री अनिल देशमुख यांच्याभोवती गराडा घातला होता. गृहमंत्र्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढून सोशल मिडियावर व्हायरल केली. त्यामुळे गृहमंत्री आता नवीन वादात सापडले आहेत.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांच्याभोवती गुन्हेगारांना गराडा असल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये गृहमंत्र्याच्या शेजारी उभ्या असलेल्या या तिघांवर गंभीर गुन्हे दाखल असून एकावर 500 ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करून विल्हेवाट लावण्याचा गुन्हा दाखल आहे. दुसऱ्यावर बलात्कार आणि अन्य गुन्हे दाखल आहेत. तडीपारीची देखील कारवाई प्रस्थावित आहे. तर अन्य एकावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी आरआर पाटील यांच्या समवेत एक गुन्हेगार उभा असल्याचा फोटो समोर आला होता. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना देखील एका गुन्हेगारांसोबत फोटो पाहायला मिळाला. मात्र येथे गुन्हेगारांच्या मधेच गृहमंत्री असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या तिघांवर औरंगाबाद शहरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यातील सय्यद मतीन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे तो बराचकाळ जेलमध्ये होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील पोलीस हातकड्या घालून हजेरी लावत होता. यातील दोन जण एमआयएमचे माजी नगरसेवक आहे. तर सय्यद मतीन याची एमआयएमने पक्षातून हकालपट्टी केली आहे. ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

COMMENTS