या प्रामाणिक मंत्र्याची जगभरात चर्चा, इतर मंत्र्यांना दिली प्रेरणा !

या प्रामाणिक मंत्र्याची जगभरात चर्चा, इतर मंत्र्यांना दिली प्रेरणा !

ब्रिटन – सध्या ब्रिटनमधील एका मंत्र्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. या नेत्याचा प्रामाणिकपणा आणि मेहनत पाहून त्यांची ही कामगिरी जगभर प्रेरणा देत आहे. लॉर्ड बेट्स असं या मंत्र्याचं नाव असून ते ब्रिटनमधल्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे प्रतिनिधी आणि मंत्री आहेत. लॉर्ड यांना संसदेत पोहचण्यासाठी एक मिनिट उशीर झाल्यामुळे त्यांनी चक्क राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. त्यांच्या खात्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ते संसदेतील त्यांच्या जागेवर उपस्थित नव्हते. याबद्दल त्यांनी संसदेत सर्वांसमोर “मी वेळेवर जागेवर नव्हतो, त्यामुळे मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो,” असं म्हटलं आहे. तसेच मला नेहमीच वाटतं आपण सौजन्यशील असणं आवश्यक आहे. त्यामुळे मी माझा राजीनामा देत आहे. मी तुमची माफी मागतो.” असं म्हणत बेट्स यांनी सरळसरळ आपला राजीनामा संसदेसमोर सादर केला.

दरम्यान लॉर्ड यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला असून “लॉर्ड बेट्स हे अत्यंत प्रामाणिक आणि मेहनती आहेत. ते त्यांच्या कामाकडे अतिशय गांभीर्याने पाहतात. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. परंतु पंतप्रधान थेरेसा मे यांनी तो स्वीकारला नसल्याची बातमी बीबीसी मराठीनं छापली आहे.

COMMENTS