राज्यात ‘या’ तारखेला सुरु होणार हॉटेल आणि लॉज, वाचा राज्य सरकारची नियमावली !

राज्यात ‘या’ तारखेला सुरु होणार हॉटेल आणि लॉज, वाचा राज्य सरकारची नियमावली !

मुंबई –  कोरोनामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, लॉज, विश्रामगृह अखेर सुरु होणार आहेत. राज्य शासनानं याबाबत अधिकृत पत्रक जारी केलं असून यात य नियमावली दिली आहे. ज्यामध्ये ८ जुलैपासून हॉटेल आणि लॉज य सुरु करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. कंटेन्मेंट झोन अर्थात प्रतिबंधित क्षेत्रांच्या बाहेर हॉटेलं ३० टक्के मनुष्यबळाच्या अटीवर सुरु करण्यात येणार आहेत. जेथे कोरोनाची लक्षणं नसणाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याचं नियमावलीत म्हटलं आहे.

दरम्यान हॉटेलमध्ये कोविड 19 विषयीची माहिती देणारे फलक, पत्रकं, स्टँडी दर्शनीय स्थळी लावावेत असं सरकारनं म्हटलं आहे. तसेच वाहनतळापासून हॉटेलच्या इतर क्षेत्रांमध्ये गर्दीच्या व्यवस्थापनासाठी योग्य ती व्यवस्था असावी. रांग लावण्यासाठी योग्य ती आखणी करणं बंधनकारक असून सोबतच बैठक व्यवस्था करतेवेळी त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जाणं आवश्यक असल्याचंही या नियमावलीत म्हटलं आहे.

प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था असावी. स्वागतकक्ष अर्थात रिसेप्शन टेबलपाशी संरक्षणात्मक काच शील्डचा वापर करण्यात यावा.  ‘पॅडल ऑपरेटेड’ म्हणजेच पायाचा वापर करुन हातावर घेता येणारे हँड सॅनिटायझर्स मोफत उपलब्ध करुन देण्यात यावेत. स्वागत कक्ष, गेस्ट रुम, लॉबी, सभागृह या ठिकाणी अशी व्यवस्था करण्यात यावी. तसेच मास्क, ग्लोव्ज, फेस कव्हर अशा वस्तू हॉटेलचे कर्मचाऱी आणि ग्राहकांना उपलब्ध करुन द्यावं.  क्यूआर कोड, ऑनलाईन फॉर्म्स, डिजिटल पेमेंट, इ वॉलेट, अशा सुविधांचा वापर करावा. जेणेकरुन एकमेकांशी होणारा संपर्क सहजपणे टाळता येईल असंही नियमावलीत म्हटलं आहे.

COMMENTS