वादग्रस्त वक्तव्यानंतर हुसेन दलवाईंची सारवासारव !

वादग्रस्त वक्तव्यानंतर हुसेन दलवाईंची सारवासारव !

नवी दिल्ली – काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांनी सारवासारव केली आहे. तिहेरी तलाकबाबत बोलताना प्रभू रामानेही सीतेला संशयातून काही काळासाठी सोडलं होतं असं वक्तव्य दलवाई यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यामुळे त्यांनी आपल्या या वक्तव्याबाबत सारवासारव करत आपण रामाने सीतेला तलाक दिला असं म्हणालो नाही तर सीता मैयाचीही अग्निपरीतक्षा घेतली गेली होती असं म्हणालो असल्याचं दलवाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान माझ्या या वक्त्याव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची माफी मागतो असंही दलवाई यांनी म्हटलं आहे. तसेच प्रभू रामाबद्दल अनादर दाखवण्याचा प्रश्नच नाही. माझ्या वक्तव्याचं मुद्दाम राजकारण केलं जात आहे. महिलांची त्यांच्या हक्कासाठी लढाई सुरु असून मी त्याचाच एक भाग असल्याचंही यावेळी दलवाई यांनी म्हटलं आहे.

COMMENTS